मलिकपेठ हे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यामध्ये असलेले एक गाव आहे. जेथे प्रामुख्याने मराठी भाषा बोलली जाते. हे गाव मोहोळपासून ५ किमी. अंतरावर सिना नदी काठी वसलेले, भौगोलिकदृष्टीने आकर्षक असे सर्व सोयी सुविधायुक्त असे गाव आहे.
गावाचे ग्रामदैवत “मलिकबाबा” आहे. उत्सवकालावधीत सर्व जातीधर्माचे लोक एकत्र येऊन उत्सव साजरा करतात. तसेच गावामध्ये “शिवशंभू” महादेवाचे आकर्षक मंदीर असून “महाशिवरात्री” दिवशी खूप मोठी यात्रा भरते. तसेच गावामध्ये सुसज्ज हनुमान मंदीर आहे.
ग्रामपंचायत मलिकपेठ अंतर्गत १) खरखटणे २) दांगडेवाडी ३) मलिकपेठ वरील तीन महसुली गावे येतात. या तिन्ही गावाची मिळून एक ग्रुप ग्रामपंचायत आहे.
खरखटणे येथील हनुमान देवस्थान जागृत देवस्थान असून दर शनिवारी भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येतात, व भाविकांची मनोकामना पूर्ण होते. सर्व ग्रामस्थ गुण्यागोविंदाने एकत्र येऊन वर्षभरातील सण उत्सव, सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमात सहभागी होतात.
स्वच्छ, सुरक्षित, समृद्ध व स्वयंपूर्ण गाव घडवणे हा आमचा दृष्टीकोन आहे. पारदर्शक प्रशासन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि पर्यावरणपूरक विकासाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाचे जीवनमान उंचावणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे.
ग्रामपंचायत मलिकपेठ चे मिशन म्हणजे पारदर्शक, जबाबदार आणि जनसहभागावर आधारित प्रशासनाद्वारे गावाचा सर्वांगीण व शाश्वत विकास साधणे. प्रत्येक नागरिकाला मूलभूत सुविधा, सुरक्षित वातावरण, गुणवत्तापूर्ण शिक्षण, आरोग्य सेवा आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
ग्रामपंचायत मलिकपेठ नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या सर्व मूलभूत सेवांचा पुरवठा करण्यासाठी कटिबद्ध आहे. ग्रामस्थांचे जीवनमान उंचावणे, त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करणे आणि सर्वांगीण विकासाला चालना देणे हेच आमच्या सेवांचे प्रमुख ध्येय आहे. खालील सेवा आम्ही सातत्याने प्रदान करतो
ग्रामपंचायत गावातील स्वच्छ पाणीपुरवठ्याची व्यवस्था करते आणि त्याची नियमित देखभाल सुनिश्चित करते, ज्यामुळे नागरिकांना सुरक्षित आणि पुरेसे पाणी उपलब्ध राहते.
ग्रामपंचायत कचरा संकलन, व्यवस्थापन आणि गावात स्वच्छता राखण्यासाठी विविध मोहीम राबवते, ज्यामुळे पर्यावरण स्वच्छ राहते आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहते.
ग्रामपंचायत शाळा सुविधा सुधारते आणि शिक्षणाच्या दर्जा वृद्धीसाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबवते.
ग्रामपंचायत गावातील अंतिम संस्कारासाठी आवश्यक जागेची व्यवस्था करते आणि तिचे नियमन, देखभाल व व्यवस्थापन सुनिश्चित करते, ज्यामुळे गावकऱ्यांना सोयीसुविधा मिळतात.
ग्रामपंचायत आग लागल्यास त्वरित प्रतिसाद देऊन मदत उपलब्ध करून देते आणि आपत्ती नियंत्रणासाठी आवश्यक पावले उचलते.
ग्रामपंचायत गावातील जन्म , विवाह आणि मृत्यू यांची नोंदणी करते.
मलिकपेठ
1962
1230.11 हेक्टर
मोहोळ
सोलापूर
महाराष्ट्र
2651
1291
1360
546
3
2
1
1
1